PShopee Terms And Conditions

पिशॉपी प्रो-अफिलिएट प्रोग्राम (पिपिपि)
(नियम आणि अटी – ग्राहकांसाठी)

“पिशॉपी”च्या ग्राहकांसाठी ऑनलाईन खरेदी करतेवेळी समजण्यास सहज आणि सोप्पी अशी नियमावली:
१. पिशॉपीचा त्यांच्या ग्राहकांना नेहमीच दर्जेदार तसेच दोष नसलेली उत्पादने आणि सेवा पुरविण्याचा प्रयत्न
असतो.
२. पिशॉपीसाठी त्यांचे ग्राहक महत्वाचे आहेत. म्हणूनच, ग्राहकांनीसुद्धा पिशॉपीची उत्पादने आणि सेवा
ऑनलाईन खरेदी करताना; एक जबाबदार ग्राहक म्हणून योग्य आणि विचारपूर्वक ऑनलाईन खरेदी करावी (इतर
ऑनलाईन वेबसाइट्ससारखे घरी, कार्यालयांमध्ये किंवा इतर कुठेही थांबून; पिशॉपीची उत्पादने आणि सेवा फक्त
पाहण्यासाठी किंवा ३ ते ४ दिवस वापरून ती पुन्हा परत करण्यासाठी मुळीच ऑनलाईन खरेदी करू नयेत. त्याचे कारण
असे कि, पिशॉपीची उत्पादने आणि सेवा त्याचसोबत पिशॉपीचा वेळसुद्धा अतिशय अमूल्य आहे.).
३. पिशॉपीसोबत ऑनलाईन खरेदी करताना संपूर्ण व्यवहार हा ऑनलाईन पेयमेन्ट पद्धतीने पूर्ण केला जाईल. रोख
रक्कमेचा कोणताही व्यवहार पिशॉपीसोबत ऑनलाईन खरेदी करताना केला जाणार नाही.
४. पिशॉपीसोबत ऑनलाईन खरेदी करून ऑनलाईन पेयमेन्ट पूर्ण झाल्यावर तुमच्या ऑर्डर्स तुम्ही दिलेल्या
पत्त्यावर पोहोचण्यास ४ ते ७ दिवस लागू शकतात. कधी-कधी काही नैसर्गिक आपत्ती तसेच तांत्रिक गोष्टींमुळे उशीर
देखील होण्याची शक्यता असते, ह्याची नोंद घ्यावी.
५. पिशॉपीने घरपोच केलेली उत्पादने आणि सेवा ग्राहकांना न आवडल्यास, ती ग्राहकांनी स्वतः ४ दिवसांच्या आत
पुन्हा पिशॉपीच्या पत्त्यावर परत करावीत (जर ग्राहकांना घरपोच दिलेली पिशॉपीची उत्पादने आणि सेवा ह्यांमध्ये
काही दोष किंवा संपूर्णतः वेगळी आढळल्यास; ग्राहकांना त्यांच्या खरेदी रक्कमेसोबत ती परत करण्याचे योग्य शुल्क
अशी एकूण रक्कम परत केली जाईल. परंतु, वरीलपैकी काहीच न आढळल्यास पिशॉपीची उत्पादने आणि सेवा जर
ग्राहकांना परत करायची असल्यास, ग्राहकांची फक्त खरेदीची रक्कम परत केली जाईल.).
६. पिशॉपीने घरपोच केलेली उत्पादने आणि सेवा परत करताना; ग्राहकांनी ती मूळ आणि जशीच्या तशी स्वरूपात
परत करावीत, तेव्हाच ग्राहकांची एकूण रक्कम परत केली जाईल. परंतु, ग्राहकांनी पिशॉपीची उत्पादने आणि सेवा
परत करताना जर फसविण्याचा प्रयत्न केला; तर मात्र ग्राहकांची एकूण रक्कम परत केली जाणार नाही.
७. पिशॉपीकडून उत्पादने आणि सेवा ऑनलाईन खरेदी केल्यानंतर जर “गूगल” (Google)वर ग्राहकांनी
“योग्य अभिप्राय” आणि “रेटिंग्स” दिलेत; तर, ग्राहक भविष्यात पिशॉपी प्रीमियम कस्टमर म्हणून भरपूर सवलती
आणि बक्षिसे जिंकू शकतात.
(सूचना: वरील सर्व नियम हे पिशॉपीच्या ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी बनविण्यात आले असून, ते समजण्यास
अतिशय सोपे आहेत. एक सुशिक्षित, समजूतदार, जाणता आणि योग्य ग्राहक बनण्यासाठी वरील नियमांचे पालन
करणे आवश्यक आहे. पिशॉपीसोबत ऑनलाईन खरेदी करताना; जर ग्राहकांनी कोणत्याही प्रकारे नियमांचे उल्लंघन
करण्याचा प्रयत्न केला किंवा उल्लंघन केले तर त्या संबंधित ग्राहकांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, ह्याची
खबरदारी घ्यावी. अधिक माहितीसाठी कृपया येथे भेट द्यावी: )