PShopee Terms And Conditions

पिशॉपी प्रो-अफिलिएट प्रोग्राम (पिपिपि)
(नियम आणि अटी – विक्रेते आणि पुनर्विक्रेते ह्यांसाठी)

पिशॉपी प्रो-अफिलिएट प्रोग्राम (पिपिपि)सोबत स्वतःच्या व्यवसायाची नोंदणी करताना तसेच स्वतःचा व्यवसाय
करताना, एक उद्योजक म्हणून “विक्रेते” आणि “पुनर्विक्रेते” ह्या सर्वांनी खालील नियमांचे पालन करणे आवश्यक
आहे:
१. पिशॉपी प्रो-अफिलिएट प्रोग्राम (पिपिपि)सोबत एक उद्योजक म्हणून; “विक्रेते” आणि “पुनर्विक्रेते” ह्या सर्वांनी
नोंदणी करताना, स्वतः बद्दलची संपूर्ण-योग्य माहिती नोंदविणे गरजेचे आहे.
२. पिशॉपी प्रो-अफिलिएट प्रोग्राम (पिपिपि)च्या माध्यमातून; फक्त आणि फक्त पिशॉपी संबंधित उत्पादने आणि
सेवा, एक उद्योजक म्हणून “विक्रेते” आणि “पुनर्विक्रेते” ह्या सर्वांनी त्यांच्या ग्राहकांना विकाव्यात.
३. पिशॉपी व्यतिरिक्त इतर कोणतीही उत्पादने आणि सेवा; एक उद्योजक म्हणून “विक्रेते” आणि “पुनर्विक्रेते”
ह्या सर्वांनी त्यांच्या ग्राहकांना पिशॉपीच्या नावाखाली अजिबात विकू नयेत.
४. पिशॉपी प्रो-अफिलिएट प्रोग्राम (पिपिपि)च्या माध्यमातून; एक उद्योजक म्हणून “विक्रेते” आणि “पुनर्विक्रेते”
ह्या सर्वांनी त्यांच्या ग्राहकांच्या ऑर्डर्सची पूर्तता करण्यासाठी, संबंधित ग्राहकांची संपूर्ण-योग्य माहिती देणे अत्यंत
गरजेचे आहे. अन्यथा कोणत्याही ऑर्डर्सची पूर्तता केली जाणार नाही, ह्याची नोंद घ्यावी..
५. पिशॉपी प्रो-अफिलिएट प्रोग्राम (पिपिपि)च्या माध्यमातून; एक उद्योजक म्हणून “विक्रेते” आणि “पुनर्विक्रेते”
ह्या सर्वांनी स्वतःचा व्यवसाय करताना, त्यांच्या ग्राहकांना पिशॉपी संबंधित उत्पादने आणि सेवा, हि मूळ
किंमतीपेक्षा जास्त किमतीला मुळीच विकू नयेत.
६. पिशॉपी प्रो-अफिलिएट प्रोग्राम (पिपिपि)च्या माध्यमातून; एक उद्योजक म्हणून “विक्रेते” आणि “पुनर्विक्रेते”
ह्या सर्वांनी स्वतःचा व्यवसाय करताना, त्यांच्या ग्राहकांना कोणत्याही प्रकारची खोटी आश्वासने पिशॉपीच्या
नावाखाली मुळीच देऊ नयेत.
७. पिशॉपी प्रो-अफिलिएट प्रोग्राम (पिपिपि)च्या माध्यमातून; एक उद्योजक म्हणून “विक्रेते” आणि “पुनर्विक्रेते”
ह्या सर्वांनी स्वतःचा व्यवसाय करताना, पिशॉपी संबंधित उत्पादने आणि सेवा भारतीय तसेच विदेशी इतर
ऑनलाईन वेबसाईट्सवर अजिबात विकू नयेत.
८. पिशॉपी प्रो-अफिलिएट प्रोग्राम (पिपिपि)च्या माध्यमातून; एक उद्योजक म्हणून “विक्रेते” आणि “पुनर्विक्रेते”
ह्या सर्वांनी त्यांच्या ग्राहकांच्या ऑर्डर्सची यशस्वी पूर्तता होण्यासाठी किंवा झाल्यानंतर; त्या ऑर्डर्स संबंधित
ऑनलाईन पेयमेन्ट वेळेवर पूर्ण करणे गरजेचे आहे. मात्र, तसे न केल्यास पिशॉपी प्रो-अफिलिएट प्रोग्राम
(पिपिपि)च्या मूळ देय रक्कमेसोबत अधिक प्रतिदिन सरळ व्याजाने १% व्याजदर आकारला जाईल. आणि
अश्याप्रकारे मूळ देय रक्कमेसोबत अधिक दिवसांचे व्याज, अशी एकूण रक्कम आकारली जाईल; ह्याची
प्रामुख्याने नोंद घ्यावी.

301-B, Om Sudarshan
CHSL., Tata Power
House, Borivali-East,
Mumbai-400066,
MH-IN.

www.pshopee.com
ppp@pshopee.com
+91 8104202424

९. पिशॉपी प्रो-अफिलिएट प्रोग्राम (पिपिपि)च्या माध्यमातून; एक उद्योजक म्हणून “विक्रेते” आणि “पुनर्विक्रेते”
ह्या सर्वांनी स्वतःचा व्यवसाय करताना, त्यांच्या ग्राहकांकडून संबंधित ऑर्डर्सबद्दल अभिप्राय घेणे गरजेचे आहे.
१०. पिशॉपी प्रो-अफिलिएट प्रोग्राम (पिपिपि)च्या माध्यमातून; एक उद्योजक म्हणून “विक्रेते” आणि
“पुनर्विक्रेते” ह्या सर्वांनी स्वतःचा व्यवसाय करताना, “व्यावसायिक दैनंदिनी बाळगणे आणि ती योग्य पद्धतीने
वापरणे” देखील अतिशय महत्वाचे आहे.
(सूचना: वरील सर्व नियम हे पिशॉपी प्रो-अफिलिएट प्रोग्राम (पिपिपि)च्या सर्व उद्योजकांच्या सुरक्षिततेसाठी
बनविण्यात आले असून, ते समजण्यास अतिशय सोपे आहेत. एक सुशिक्षित, समजूतदार, जाणता आणि योग्य
उद्योजक होण्यासाठी वरील नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. वरील नियमांपैकी कोणत्याही नियमांचे उल्लंघन
करून जर उद्योजकांनी बेकायदेशीर व्यवहार करण्याचा प्रयत्न किंवा व्यवहार केल्याचे आढळून आले, तर त्यासंबंधित
उद्योजकांना कोणतीही पूर्वसूचना न देता त्वरित पिशॉपी प्रो-अफिलिएट प्रोग्राम (पिपिपि)मधून निलंबित केले
जाईल. त्याचबरोबर त्या संबंधित उद्योजकांवर योग्य ती कायदेशीर कार्यवाही केली जाईल, ह्याची खबरदारी घ्यावी.
अधिक माहितीसाठी कृपया येथे भेट द्यावी: )